PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 4, 2024   

PostImage

सावधान! मेलेल्या म्हशीला जेव्हा वाघ खातो


 

गडचिरोली : शहराला लागूनच झुडपी जंगल आहे. या जंगलात गेल्यापाच वर्षांपासून वाघाचा वावर आहे. शहराच्या बाहेर भ्रमंती करणाऱ्यांना अधूनमधून वाघ दृष्टीस पडतो. अशातच मंगळवार, ३० जुलै रोजी शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृत म्हशीवर ताव मारताना वाघाचे छायाचित्र वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यांनी घेतले. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. गडचिरोली शहराच्या गोकूळनगर येथील नामदेव वैरागडे यांच्या मालकीची म्हैस सेमाना उद्यान परिसरात चराईसाठी गेली होती. त्या म्हशीसोबत अन्य म्हशीसुद्धा होत्या; परंतु, ही म्हैस गाभण असल्याने ती जास्त चालू व धावू शकत नव्हती. दरम्यान, सोमवारी कक्ष क्रमांक १७० मध्ये वन्यप्राण्यांनी या म्हशीचा पाठलाग केला. तेव्हा ती चिखलात फसली व तेथेच बसून राहिली. वन्यप्राण्यांनी तिच्यावर मागील बाजूने पाठीवर हल्ला करून लचके तोडले. यात त्या म्हशीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे जाणून घेण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले असता रात्री वाघाचे छायाचित्र कॅमेराने टिपले. या घटनेमुळे या परिसरात वाघाचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023   

PostImage

Tiger attack : वाघाच्या हल्ल्यात सरपण गोळा करणारी महिला जखमी


 

गडचिरोली : गावापासून १ किमी अंतरावर सरपण गोळा करत असताना वाघाने महिलेवर हल्ला केला; परंतु सोबतच्या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर तेथून वाघाने धूम ठोकली. मात्र महिला यात किरकोळ जखमी झाली, ही घटना तालुक्यातील बोदली येथे शनिवार ३० डिसेंबर रोजी घडली.

 

मंदाबाई बंडू कोठारे (५०) रा. बोदली असे जखमी महिलेचे नाव आहे. मंदाबाई ह्या इतर ८ ते १० महिलांसोबत गावापासून १ किमी अंतरावरील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी शनिवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गेल्या. हा झुडपी जंगल परिसर प्राथमिक आरोग्य केंद्राला मागच्या बाजूने लागून आहे. सरपण गोळा करण्यात सर्व महिला व्यस्त असताना परिसरातच वाघ झुडपात दबा धरून बसला होता. सकाळी ११ वाजता संधी साधून वाघाने मंदाबाईवर हल्ला केला; परंतु सुदैवाने त्याचा वार हुकला. मंदाबाईवर वाघाने हल्ला करताच सोबतच्या महिलांनी आरडाओरड केली. तेव्हा वाघाने तेथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023   

PostImage

Tiger news: गिरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात बैल ठार


 

 

 वाढोणा, (वा.). ब्रम्हपुरी वन विभागाच्या तळोधी (बा.) वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गोविंदपूर उपक्षेत्रातील गिरगाव येथील आंबेघाटा तलावाच्या लगत असलेल्या परिसरात चरत असलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून बैलाला जागीच ठार केले. ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे बैल मालक श्रीधर हनुजी मोहुर्ले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील श्रीधर हनुजी मोहुर्ले हे नेहमी प्रमाणे शनिवारी त्यांच्या मालकीच्या बैलांना व शेळ्यांना जंगलालगत असलेल्या गिरगाव येथील आंबेघाटा तलावा जवळील परिसरात जनावरे चारावयास घेऊन गेले होते. मात्र, तिथे तबा धरून बसलेल्या वाघाने शेळ्यांच्या

 

जवळ एकटा चरत असलेल्या बैलावर अचानक हल्ला करून त्याला जागीच ठार केले. मोहुर्ले यां नी आरडाओरड केली. तोपर्यंत वाघाच्या हल्यात बैल ठार झाला होता. यामुळे गरीब शेतकऱ्यांची मोठी आर्थिक नुकसान झालेली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बैलाची किंमत जवळपास 40 हजार रुपये असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. दरम्यान सदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या गरीब परिस्थितीचा विचार करून वनविभागाने त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे येथील नागरिकांत वाघाची मोठी दहशत पसरली आहे.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 29, 2023   

PostImage

Tiger Attac ; वाघाच्या हल्यात विहिरगाव येथील गुराखी ठार


विहिरगाव येथील घटना

चिमूर प्रतिनिधी :-

      दबा धरून बसलेल्या वाघाने एका गुराख्यावर हल्ला करून गुराखीला ठार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. ही घटना पळसगाव वनपरिक्षेत्र मधील बेलारा येथे दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास घडली. मधुकर जंगलू धाडसें (४९ ) रा.विहिरगाव,ता. चिमूर, जि. चंद्रपूर) अशी मृतकाचे नाव आहे.
    पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहिरगाव बेलारा पळसगाव या वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने या परिसरात सफारी साठी पर्यटकांची पाहुले वळत असतात. गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती हे आळीपाळीने गुरे चराईसाठी पाच ते सहा व्यक्तीच्या समूहाने नेत असतात रविवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान मधुकर धाडसे हे आपल्या सहा गुराखी सोबत गावातील गुरे चारण्याची त्यांची पाळी असल्याने ते आपल्या ६ सहकाऱ्यांसह मन्सराम जीवतोडे यांच्या पडीत असलेल्या शेतात जनावरे चारणासाठी गेले होते. गुराखी गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. जनावरे हंबरु लागल्याने बाकी असलेल्या गुराखी यांनी धाडसे यांना आवाज दिला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांचा शोध घेतला असता नाल्याजवळ काही अंतरावर त्याचे फरकडत नेल्याच्या पाहुल खुणा आडल्याने त्या खुणा बघत बघत जात त्याचे प्रेत नाल्याजवळ मिळाले आहे.
        या हल्ल्यात मानेच्या खाली शरीराचा काही भाग हल्ला केल्याचे दिसून आले. वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे विहिरगाव बेलारा या गावात वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसून येत होते. वनविभागाने घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालया चिमूर येथे नेण्यात आले आहे.